Wednesday, 7 December 2016


 -  महत्वाची सुचना  - 
विकास रीयूनियन ग्रुप मधील सर्व सभासदांना कळविण्यात येत आहे की, येत्या नविन वर्षात एक आगळा वेगळा उपक्रम करण्याचा विचार केला आहे, त्यासाठी आपल्या दुसऱ्या वर्धापन दिनी हां कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. दिनांक २९ मार्च २०१७ वर बुधवार. 

सविस्तर माहिती आपणास लवकर मिळेल 

Monday, 29 February 2016


विकास रीयुनिअन ग्रुप २००१ पहिला वर्धापन दिन
पुढील माहिती लवकरच कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी.


नमस्कार मित्र-मैत्रिणिनो गेल्या वर्षी दि.२९ मार्च २०१५ रोजी,
आपण सर्वे एकत्र येउन पुन्हा शाळेत गेल्याचा अनुभव गेतलात:
तसेच आपल्या गाठीभेटी सतत होत. राहिल्या तुम्हाला जवळ
एकत्र आण्यासाठी हीच संधी आम्ही पुन्हा आपल्याला देत आहोत.
या साठी आपणास नोंदणी करण्यासाठी रक्कम रु. ५०० आकारण्यात येईल,
याची सर्वांनी नोंद घावी.


NILESH DATTARAM MOHITE
A/C - 014010110002652
IFSE CODE - BKID0000140
BANK OF INDIA 

दि. 10 एप्रिल २०१६.
ठिकाण - गणेश मैदान,३९४ बस स्टोप, विक्रोळी. 
वेळ - 4pm

कार्यक्रमाची रूपरेषा
१) सत्कार समारंभ 
२) सास्कृतिक कार्यक्रम / खेळ 
३) नृत्य (DJ)
४) जेवणाची व्यवस्था

महत्वाची सुचना - ज्या वैक्तींना गणेश मैदानात स्टोल लावायचे असतील. 
तर आपणास श्री.श्रीकांत मोरे यांस कडे संपर्क साधावा. 
स्टोल उभारण्यासाठी आपणास रक्कम रु. १०० देऊन नोंदणी करावी लागेल 
(अटी लागु.)

कार्यक्रमातील बदल करण्याचे अधिकार फक्त कार्यकारणी जवळ असेल याची नोंद घ्यावी.
आपला मित्र परिवार 
विकास रीयुनिअन ग्रुप

info. email : vikasreuniongroup@gmail.com
Shrikant More - 9773285757
Nilesh Dattaram Mohite - 8082437016 / 9867103124




विकास रीयुनिअन ग्रुप २००१

 पहिला वर्धापन दिन



आम्ही २९ मार्च २०१५ ला सर्वे १५ वर्षांनी भेटलो. फेसबुक तसेच व्होट्सअपवर एक ग्रुप बनवला. सर्वजण एकत्र येण्यासाठी आमच्या शाळेतील दोन विद्यार्थी श्रीकांत मोरे व निलेश मोहिते यांनी स्न्हेसामेलानाचा पुढाकार घेतला. त्यांच्या मेहनितीला यश देखील लाभले. दोन महिन्याच्या धावपळीने जवळ जवळ १०० पेक्षा जास्त विध्यार्त्यांशी संपर्क साधला. स्न्हेह्सामेलाना आधी गाठीभेटी करून एक छानसा दिवस ठरवण्यात आला आमच्या विकास हायस्कुल, विक्रोळी जवळील सभागृहात एकत्र जमलो. 
ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो. तो दिवस २९ मार्च दिवस उजाडला काही विद्यार्थी लवकरच येउन सजावट करण्यासाठी आले. मुलीनी सुंदर अशी रांगोळीहि काडली. काही वेळाने एक एक करून विद्यार्थी येऊ लागले,तासाभरात संपूर्ण वर्ग भरला. कार्यक्रमाचे खास आकर्षण बनले विकास हायस्कुल चे संचालक प्रा. प. म. राउत सर यांचे सुपुत्र विकास राउत सर, याच शाळेचे माझी विध्यार्थी, यांच्या प्रमुख उपस्तीतीत कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. 

आमच्या मधील काही विद्यार्थी मित्र हे देव घरी गेले होते. प्रथम श्रद्धाजली वाहिली त्यानंतर प्रार्थना गेण्यात आली, नंतर विद्यार्थी मित्र मैत्रिणीनी आपली ओळख करून दिली. बहुतेक मुल खूप लांबून आले होते. बोर्डात पहिल्या क्रमांकाच्या विध्यार्थापासून सर्वांनी हजेरी लावली होती. खुप खुप मजा केली असे वाटलेच नही कि आम्ही पुन्ना १५ वर्षाने भेटलो आहोत. जणू काही आजून त्याच वर्गात आहे असे वाटत होते, उत्तम शी जेवणाची सोय करण्यात आली होती. 
विद्यार्थ्यांकडून शिक्षकाना मानचिन्ह देण्यात आले. दिवसाच्या अखेरीस निरोप घेता घेता काहीचे डोळ्यातील अश्रू आवारातच नव्हते. 
या साठी आम्ही "विकास रीयुनियन ग्रुप" ची स्थापना केली त्याचा पहिला वर्धापन दिन येत्या दिनाक - 10 एप्रिल २०१६ रोजी करण्याचे योजिले आहे. जेणे करून प्रत्येक वर्षी एकदा तरी भेट व्हावी व आठवणीना उजाळा मिळावा.

आपला वृग परिवार 
विकास रीयुनियन ग्रुप 
- निलेश मोहिते 
- श्रीकांत मोरे

Monday, 15 February 2016

NEAL ARTS PHOTOGRAPHY

 

THANKS...TO ALL

VIKAS REUNION GROUP 2001 

"विकास रियुनियन ग्रुप" आणि या शाळेतील माजी विद्यार्थी श्री.श्रीकांत मोरे. आणि श्री.निलेश दत्ताराम मोहिते. यांच्या दोन महिन्याच्या अथोनाथ प्रयत्नाने हा सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाला. विद्या विकास एज्युकेशन सोसायटी (विक्रोळी) चे संचालक श्री.विकास राऊत सर आणि त्यांचे सहकारी तसेच श्रीमती.रावराणे मेडम, श्रीमती.देशमुख मेडम व श्री.वाणी सर. दि. २९.०३.२०१५ रोजी माजी विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत हा अविस्मरणीय असा दिवस लाभला आहे. 
(१५ वर्षांनी एकत्र आले आहेत, १०वी वर्ष २००१.)


COMING UP 2016
10.04.2016




Sunday, 10 January 2016

"मुंबईकर इवेन्ट"

उत्तम अशी शाकाहारी जेवण आणि मुंबई मध्ये नावाजलेले असे आपल्याच शाळेतील विद्यार्थी यांनी एक "मुंबईकर इवेन्ट" निर्माण केले. त्यांना आमच्या विकास रीयुनिअन ग्रुप तर्फे पुढील आयुष त्यांचे भरभराटीचे यश लाभो हीच शुभेच्या.